पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वाडिया रुग्णालयाचा निधी त्यांना मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे'

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दादर येथील इंदू मिलची पाहणी केली. त्याचसोबत या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामकाजाची देखील त्यांनी पाहणी केली. दरम्यान, 'वाडिया रुग्णालयाचा निधी त्यांना मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक देशाबाहेर देखील आकर्षणाचं केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अशोभनीय, निंदनीय...नव्या व्हिडिओवर संभाजीराजे संतप्त

शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या स्मारक आराखड्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दोन वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करणं शक्य आहे त्यासाठी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी काम मनावर घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकरांचे स्मारक आकर्षण झाल्या शिवाय रहाणार नाही. जगामध्ये जिथे जिथे बौध्द समाज आहे त्या सर्वांना या स्मारकाविषयी आकर्षण ठरणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

गॅस हिटरमुळे केरळच्या ८ पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू

दरम्यान, वाडिया रुग्णालयाचा निधी त्यांना मिळेल पण स्मारक झालेच पाहिजे. वाडिया रुग्णालयाच्या निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असल्याचे शरद पवारांनी सांगितले. तसंच, स्मारकाला आता विलंब लागणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि जयंतीला योग्य नियेजन केले जाईल. गर्दीच्या काळात स्मारक परिसरात काळजी घ्यावी लागेल असे शरद पवार यांनी सांगितले. तसंच, योग्य सल्ले द्यावे बाकीच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करावे असे त्यांनी सांगितले. 

हवी तेवढी निदर्शने करा, CAA मागे घेणार नाही - अमित शहा