पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पवारसाहेबांनी आत्मचिंतन करण्याची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

भाजप सरकार चौकशीची भीती दाखवून राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देत असल्याचा शरद पवार यांचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. तुमचे लोक राष्ट्रवादीत राहण्यासाठी का तयार नाहीत, याचे पवारसाहेबांनी आत्मचिंतन करावे, असा टोला ही त्यांनी लगावला आहे. तसेच दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भाजपला गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही फोडाफोडी नाही, विरोधी पक्षातील नेत्यांनाच भाजपचे आकर्षण आहे. आम्ही सरसकट कोणालाच पक्षात प्रवेश देणार नाही. अनेक जण इच्छुक आहे. पण आम्ही निवडकांनाच घेत आहोत. जे चांगले आहेत, लोकाभिमुख काम करतात, ज्यांचा जनसंपर्क चांगला आहे, त्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. ईडीची चौकशी असणाऱ्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. 

चौकशीची भीती दाखवून नेत्यांना धमकावलं जातंय, शरद पवारांचा सरकारवर आरोप

गेल्या ५ वर्षांत आम्ही शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक कारखाने, संस्थांना नियमांत बसणारी आर्थिक मदत करुन सावरले आहे. ज्यांना मदत केली, त्यांना कधीच पक्षात येण्यास सांगितले नाही. दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भाजपला गरज नाही. उलट पवारांनी आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, ईडी, सीबीआयचा वापर करत लोकप्रतिनिधींना धमकावले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी वास्तव, अवास्तव चर्चा केली जात आहे. कारखाने, बँकां तसेच काहींना वैयक्तिक खटल्यांची भीती दाखवून पक्षात घेतले जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता.

मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही: शरद पवार