पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि शरद पवारांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी संध्याकाळी मुंबईमध्ये पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी या महिन्यात निवडणूक होते आहे. त्यासंदर्भात आमदारांना या बैठकीत स्वतः शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटच्या निर्णयाचेच शिवसेनेकडून वाभाडे

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, आम्ही राज्यसभेच्या सातपैकी दोन जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार बुधवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती काय असेल यावर आमदारांना मार्गदर्शन करतील.

मध्य प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचानंतर आता महाराष्ट्रातही भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक बोलावलेली नाही, असे पक्षाच्या एका मंत्र्याने स्पष्ट केले. बुधवारी होणारी बैठक एक आठवड्यापूर्वीच निश्चित झाली होती. मध्य प्रदेशमधील राजकीय पेच मंगळवारी निर्माण झाला आहे, याकडे या मंत्र्याने लक्ष वेधले. 

कोरोनामुळे पुण्यातील काही शाळा रविवारपर्यंत बंद

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्रातील परिस्थिती मध्य प्रदेशपेक्षा वेगळी आहे, असेही त्यांनी सांगितले.