पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीला झटका; आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत

आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसला आहे. शहापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दादर येथील शिवसेना भवनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले. पांडुरंग बरोरा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

 

VIDEO : भाजप आमदाराचा प्रताप; हातात शस्त्र घेऊन डान्स

पांडुरंग बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

आमदारासमोर कार्यकर्त्यांची दादागिरी; आगार व्यवस्थापकाला