पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वानखेडेवरील धक्काबुक्की प्रकरणात शाहरुख खानला दिलासा, याचिका फेटाळली

Shah Rukh Khan, zero failure

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरक्षारक्षक आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकऱणी अभिनेता शाहरुख खान याला दिलासा मिळाला आहे. शाहरुख खान विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबईतील न्यायालयाने पुराव्यांअभावी फेटाळली आहे. या प्रकरणात मरिन ड्राईव्ह पोलिसांनी दाखल केलेला तपासबंद अहवाल न्यायालयाने स्वीकारला आहे.

१६ मे २०१२ रोजी आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मुंबई इंडियन्सविरोधात विजयी झाल्यानंतर मैदानावर जल्लोष करण्यात आला होता. यावेळी जल्लोषानंतर शाहरुख खान आणि वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षक व इतर पदाधिकारी यांच्यात वादावादी झाली होती. यावेळी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. हा वाद त्यावेळी गाजला होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

आदित्य ठाकरेसोबतच्या मैत्रीविषयी दिशा म्हणते....

शाहरुख खानने या घटनेनंतर त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. माझ्यासोबत असलेल्या एका लहान मुलाला सुरक्षारक्षकाने ढकलले. त्यामुळे मी केवळ त्या सुरक्षारक्षकावर ओरडलो होतो, असे शाहरुखने म्हटले होते. या प्रकरणातील व्हिडिओंच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते अमित मारू यांनी ११ मे २००१५ रोजी मुंबईतील न्यायालयात शाहरुख खान याच्याविरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मरिन ड्राईव्ह पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 

या प्रकरणात घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका सुरक्षारक्षकाचा जबाब न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदविला आहे. घटना घडली त्यावेळी शाहरुख खानने मद्यपान केले होते की नाही, हे मला माहिती नाही. त्याचबरोबर त्याने लहान मुलांसमोर माझ्याविरुद्ध कोणतेही अपशब्द वापरले नाहीत. हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच शाहरुख सोबत असलेली लहान मुले तिथून निघून गेली होती, असे या जबाबात म्हटले आहे.