पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून राज्य सरकारसंदर्भात मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

मिलिंद देवरा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये यंत्रणा तयार करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी सोनिया गांधींना पाठविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत आल्यावर मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गर्भपातासाठीच्या कालावधीत वाढ, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यात सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी आहेत. त्यात शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे महत्त्वाची खाती आहेत.

सोनिया गांधी यांना २४ जानेवारीला पाठविलेल्या पत्रामध्ये मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की, सरकारच्या पहिल्या ५० दिवसांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करण्यात आले आहे. आता काँग्रेसनेही निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काम सुरू केले पाहिजे. राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत गरिबांना ५०० चौरस फुटाची घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. ते पूर्ण केले पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुन्हा अर्णवला भेटलो... कुणालचे नवे ट्विट, तीन विमान कंपन्यांची बंदी

इतक्या महत्त्वाच्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अजून काहीच प्रयत्न करण्यात आलेले नाही, याबद्दल मला चिंता वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. आश्वासनांच्या पूर्ततेसाठीच यंत्रणा प्रस्थापित करावी, अशी विनंती त्यांनी केली. इतर राज्यांच्या आधारवर ही यंत्रणा तयार केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.