पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

दिवंगत अरुण काकडे

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे आज (बुधवार) दुपारी मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. काकडे हे ९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. तसेच 'आविष्कार' नाट्यसंस्थेचे आधारस्तंभही होते. 

त्यांच्या कामगिरीची दखल घेत भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला होता. काकडे यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) रात्री ८ वाजता अंधेरी पूर्व येथील सहार रोडवरील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काकडे अरुण काकडे यांना श्रद्धांजली वाहिली. मराठी प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड असणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने रंगभूमीसाठी सातत्याने सकारात्मक चळवळ करणारा खरा कार्यकर्ता हरपला, प्रायोगिक रंगभूमीच्या अविष्कारासाठी ते आयुष्यभर झटले, या शब्दात तावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

भालबा केळकर या गुरुपासून सुरु झालेला काकडे काकांचा रंगप्रवास आज थांबला. सतत नाटकाचा ध्यास घेतलेले व नवनवीन युवकांना संधी देत त्यांच्या माध्यमातून रंगभूमीवरील नाविन्यतेचा शोध घेणे हे त्यांचे जीवित कार्य होते. गेली साठ वर्षे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी प्रायोगिक रंगभूमीची प्रामाणिकपणे सेवा केली असेही तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे त्यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह असावे म्हणून नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नाट्यसृष्टीतील अन्य ज्येष्ठ रंगकर्मीसह काकडे यांनी केलेल्या या आग्रही मागणीचा विचार करुन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई येथे केवळ प्रायोगिक नाटकांसाठी आधुनिक नाटयगृहाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या बांधकामाच्या नुतनीकरणाचा नारळ काकडे काका यांच्या हस्ते वाढविला होता याचे स्मरणही तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात केले आहे.