पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे निधन

गिरिजा कीर

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध वाङ्मयप्रकारांतील लेखनाने त्यांनी मराठी साहित्यामध्ये आपली छाप सोडली आहे. त्याच्या लेखनात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी वैविधता आढळते. 

हेरगिरी प्रकरणात व्हॉटसअ‍ॅपने खुलासा द्यावा : केंद्र सरकार

१९६८ ते १९७८ या काळात त्यांनी 'अनुराधा' मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही काम पाहिले. सामाजिक बांधिलकी राखत त्यांनी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागातील लोकांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. अनुभवांतून मांडणी  हे त्यांच्या लिखानाचे खास वैशिष्ट्येच होते.  

निर्मला सीतारामन यांच्या टीकेला रघुराम राजन यांचे खणखणीत

मराठीतील उत्कृष्ट साहित्याबद्दल त्यांना ह.ना.आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, मराठी ग्रंथालय पुणे यांच्याकडून दिला जाणारा कमलाबाई टिळक पुरस्कार यासह अभिरुची पुरस्कार आणि श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.