पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अग्रलेखांचा बादशहा' नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

नीळकंठ खाडिलकर

ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लीलावती रुग्णालयात उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता मरीन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, गिरगाव येथील दैनिक नवाकाळच्या कार्यालयात दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महत्वाची बैठक; आज सरकार स्थापनेचा दावा?

'अग्रलेखांचा बादशहा' अशी त्यांची ओळख होते. ते नवाकाळ या वृत्तपत्राचे २७ वर्ष संपादक होते. या काळात त्यांनी अनेक महत्वाच्या घडामोडींवर अग्रलेखातून भाष्य केले होते. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार देखील होते. नीलकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल १९३४ रोजी झाला होता. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते.

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; ठाकरे-पवार यांच्यात एकतास

नीलकंठ खाडिलकरांचे 'हिंदुत्व' हे पुस्तक प्रसिध्द असून ते वाचक आणि समीक्षकांनी या पुस्तकाला खूप पसंती दिली. २००८ साली खाडिलकरांना महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जावनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत 'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार आणि लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत.  

उद्धव ठाकरेंविरोधात औरंगाबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार