पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे निधन

माधव आपटे

ज्येष्ठ उद्योजक आणि माजी क्रिकेटपटू माधव लक्ष्मणराव आपटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईचे नगरपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. १९५२ ते ५३ या एका वर्षामध्ये त्यांनी सात कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.

२६ सप्टेंबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर; युतीचा तिढा सोडवणार?

५ ऑक्टोबर १९३२ रोजी आपटे यांचा जन्म झाला. त्यांच्या आजोबांनी कापड उद्योग आणि साखर कारखाने सुरू केले होते. मुंबईत स्कॉटिश शाळेत असतानाच त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कला शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. 

विनू मंकड यांच्या मार्गदर्शनाखाली १९४८ मध्ये आपटे यांनी फिरकी गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्यास सुरुवात केली. ते उत्तम फलंदाजही होते. १९५१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते भारतीय विद्यापीठांच्या संघातून खेळले होते. १९५२ मध्ये ते रणजी करंडकासाठी सौराष्ट्राच्या संघाविरुद्ध मैदानात उतरले होते. दुखापतीमुळे विजय मर्चंट यांना संघातून माघार घ्यावी लागल्यामुळे माधव आपटे यांना त्यावेळी संधी मिळाली होती. त्याचवर्षी त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. 

दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत, मोदींचा पाकला सूचक इशारा

१९८३ मध्ये त्यांची मुंबईचे नगरपाल म्हणून निवड झाली होती. मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम बघितले होते. आपटे समूहातील कंपन्यांचे ते अध्यक्ष राहिले होते.