पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

शरद पवार

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ही भेट झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी पवारांची भेट घेतील. यावेळी काँग्रेसचे नेते आणि पवार यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. 

सत्तापदांच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही, लढत राहण्याचे वचन

शिवसेना-भाजपच्या सत्तेच्या राजकारणात नेमकी काय भूमिका घ्यायची यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 'आमची आघाडी आहे. त्यामुळे आघाडीच्या प्रश्नांबाबत आमची चर्चा झाली. राज्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी आघाडीने महत्वाची भूमिका घेतली पाहिजे यावर आमची चर्चा झाली', असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

कराची-रावलपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग; १६ प्रवाशांचा मृत्यू

दरम्यान, परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आयसिसच्या म्होरक्याविरोधातील कारवाईचा व्हिडिओ