पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली. वडेट्टीवार यांच्या रूपाने विदर्भाला पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते पदाचा मान मिळाला आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करा, असे पत्र विधानसभा अध्यक्षांना मागील आठवड्यातच दिले होते. 

शिवसेनेच्या युवा संघटनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. गडचिरोली जिल्हा परिषदेत नामनियुक्त सदस्य म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला. शेतमजूर, वनकामगार आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडून वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती देत अभिनंदन केले. विद्यमान गृहनिर्माण मंत्री आणि पूर्वीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे जागेवर जाऊन अभिनंदन केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Senior Congress leader Vijay Wadettiwar appointed as the new leader of Opposition in the Legislative Assembly