पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐरोलीत ७२ वर्षांच्या आजींचा साखळी चोराला रोखण्याचा प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र

ऐरोलीमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका ७२ वर्षांच्या आजींना आपल्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या चोराचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण साखळीचोराने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकलेली असल्याने त्या फार काळ प्रतिकार करू शकल्या नाहीत. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चेन चोरून नेली. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NRC संदर्भात गृह मंत्रालयाची महत्त्वाची माहिती, हे पुरावे आवश्यक नाही

कमल गुप्ता असे या आजींचे नाव आहे. त्या ऐरोलीत सेक्टर क्रमांक चारमध्ये राहतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी त्या बागेच्या दिशेने फिरायला निघाल्या होत्या. रात्री पावणेआठच्या सुमारास पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांना पुढे ढकलले. त्या खाली पडल्यावर त्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. चोरटा नीट दिसत नसला तरी आजींनी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि तो पळून गेला. या चेनची किंमत ४० हजार रुपये आहे.

'ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या'

गुप्ता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या चोरट्याचे वय अंदाजे ४० असले पाहिजे. गेल्या आठवड्यापासून मी रोज इथे फिरायला येते. मी त्या माणसाला आधी इथे बघितले आहे, असे आजींनी पोलिसांना सांगितले. आजींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी त्या चोरट्याचे रेखाचित्र तयार केले आहे. त्याचा शोध घेतला जातो आहे.