पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर डोकं फुटेल; दिलीप लांडेंचा इशारा

शिवसेना आमदार दिलीप लांडे

'शिवसेनेचा आमदार फोडणं तसं शक्य नाही. पण कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोकं फुटेल.', असा इशारा शिवसेनेचा आमदार दिलीप लांडे यांनी दिला आहे. शिवसेनेने आपला आमदार फुटू नये या भितीपोटी सर्व आमदारांना मढ येथील हॉटेल रिट्रीटवर ठेवले होते. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना मतदार संघामध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेचे सर्व आमदार आपल्या मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. हॉटेल रिट्रीटमधून मतदारसंघाकडे जात असताना दिलीप लांडे यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले.  

'भाजपपेक्षा शिवसैनिकांना नरेंद्र मोदींचा जास्त आदर आणि म्हणूनच...'

राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी १४५ आमदारांचे संख्याबळ हवे आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. अशातच भाजपने सुध्दा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले होते. दरम्यान, इतर पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य सुध्दा या राजकीय नेत्यांनी सुरु केली आहेत. त्यामुळे आमदार फुटीची भिती शिवसेनेला देखील आहे. 

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचे प्रकरण आता घटनापीठाकडे
 
विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन २२ दिवस झाले. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्याने आणि सत्ता स्थापनेच्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी राज्यामध्ये महाशिवआघाडीचे सरकार आणण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु असून त्यांच्या बैठका सुरु आहेत. 

त्या दोन घटनांमुळे राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेस साशंक