पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात शिवसेना - अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

कल्याणमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि युवासेनेच्या कार्यक्रमात राडा झाला. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्रामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही घटना घडली आहे. कुलगुरुंचे भाषण सुरु झाल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमामध्ये निषेधाच्या घोषणाबाजी केली. त्यानंतर संतप्त झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप अभाविपनं केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्येच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यामुळे कार्यक्रमामध्ये काहीकाळ गोंधळाचे वातावरण होते. 

पाकिस्तानमध्ये अकबर एक्स्प्रेसला अपघात; १० ठार तर ६४ जखमी

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपक्रेंद्र गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होते. या उपक्रेंद्राचे आज उद्घाटन होते. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार होते हे अभाविपच्या कार्यकर्त्यांना माहिते होते. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी चालतील मात्र राजकीय पदाधिकारी नको असा पवित्रा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घेतला होती. या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले त्यावेळी कुलगुरु सुहास पेडणेकर यांचे भाषण सुरु होते. कुलगुरुंचे भाषण सुरु असतानाच अभाविपाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणाबाजी सुरु केल्या. 

पिक विम्यासंदर्भात १७ जुलै रोजी शिवसेनेचा मोर्चा

यावेळी आदित्य ठाकरे आणि कुलगुरुंनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्यांच्या घोषणाबाजी सुरुच असल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.