पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान आणि दादर परिसरात जमावबंदी लागू

मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह, एमआरए मार्ग, दादर आणि आझाद मैदान पोलिस ठाणे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. या परिसरामध्ये चारपेक्षा अधिक लोकांना उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

Raj Thackeray Live: राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेने ठाणे बंदची हाक आणि ईडीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचे सांगितले होते. मात्र राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि ईडी कार्यालयावर न येण्याचे आवाहन केले. तरी देखील मुंबईमध्ये मनसेच्या नेत्यांनी 'इडियट हिटलर' लिहिलेले टी-शर्ट घातले आहेत. तर, मुंबईतून संदीप देशपांडे, संतोष धुरी या मनसे नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नोटीस पाठवली. मनसे कार्यकर्ते एकत्रित येत कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशाप्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे कलम १४९ अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल, असे देखील पोलिसांनी या नोटीसमध्ये सांगितले आहे.

राज ठाकरे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार