पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मस्जिद बंदर येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

मुंबईतल्या डोंगरी येथे इमारत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. मस्जिद बंदर येथे शुक्रवारी इमारत कोसळून एका कामगाराचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मस्जिद बंदरच्या नागदेवी क्रॉस लेन येथील सय्यद इमारत कोसळली. या इमारतीला सकाळी आग लागली होती. आगीनंतर इमारतीचे तोडकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली.

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे 29 जणांचा मृत्यू; 6 बेपत्ता

नागदेवी क्रॉस लेनमध्ये असणारी सय्यद इमारत ही लाकडाची होती. म्हाडाने या इमारतीला 5 ऑगस्ट रोजी पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र या इमारतीला आज सकाळी 9 च्या सुमारास आग लागली. इमारतीची आग विझवण्यात यश आले. त्यानंतर   इमारतीचे तोडकाम सुरु करण्यात आले. 5 कामगार तोडकाम करत असताना अचानक इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एकावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची चिंताजनक आहे. तर 3 कामगारांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. 

जम्मूमध्ये जमावबंदी हटवली; उद्यापासून शाळा होणार सुरु