पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पुढील पिढीसाठी इंधनाचा काटकसरीने वापर करा'

कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ

जनतेने उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करुन पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.  

गुंडाला महामंडळावर घेणाऱ्यांनी बोलूच नये, थोरातांचा फडणवीसांना टोला

 पेट्रोलियम पदार्थाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेद्वारे आयोजित ‘सक्षम अभियान २०२०’ कार्यक्रमाचे उद्‌घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.  

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायचे का?: फडणवीस

छगन भुजबळ म्हणाले, विकासाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची व राज्याची ऊर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत ऊर्जा साधनांचा काटकसरीने वापर देशाच्या व राज्याच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल ठरते. राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जेचा व इतर साधनांचा वापर करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत