पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिशा कायद्यासाठी स्वतंत्र समिती गठीत; सतेज पाटलांची माहिती

गृहराज्यमंत्री सतेज पाटील

महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली, असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

दिल्लीला वाचवायचं असेल तर लष्कराकडे सोपवाः ओवेसी

सतेज पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या ट्विटसोबत त्यांनी शासन निर्णयाचे पत्रक देखील जोडले आहे. नवा कायदा तयार करण्यासाठी गठीत केलेली समिती १० दिवसांमध्ये कायद्याचा मसुदा सादर करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात येण्यास मदत होणार असल्याचे देखील सतेज पाटलांनी सांगितले. 

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

गठित करण्यात आलेल्या स्वतंत्र समितीच्या अध्यक्षपदी अस्वती दोरजे, संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी(MPA) या असणार आहे. या समितीमध्ये अस्वीत यांच्यासोबत नियती ठाकेर दवे, पोलिस उपायुक्त (परिमंडळ ५ मुंबई), व्यं. मा. भट, उप सचिव गृहविभाग,(मंत्रालय, मुंबई) आणि आवश्यकता असल्यास नागरी समाजातील आणि कायदेशीर क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे, असे सतेज पाटील यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  

भाजपतून निलंबित आमदाराचे विधानसभा सदस्यत्वही रद्द