पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोमवारच्या घडामोडींनंतर संजय राऊत यांचे लीलावतीतून सूचक ट्विट

संजय राऊत (ANI)

राज्यातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान झाल्या आहेत. क्षणाक्षणाला नवीन माहिती पुढे येत आहे. सोमवारी दिवसभर मुंबई आणि नवी दिल्ली राजकीय हालचालींचे केंद्र बनले होते. पण यातच मंगळवारी सकाळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदी कविताच्या काही ओळी दिल्या आहेत. 
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती...
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य या ओळीतून करण्यात आले आहे. या ओळींखाली संजय राऊत यांनी हम होंगे कामयाब... जरूर होंगे असेही लिहिले आहे.

'महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे'

संजय राऊत यांच्या ट्विटला सोमवारी घडलेल्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला आपला सत्ता स्थापनेचा दावा सादर करायचा होता. पण या वेळेमध्ये शिवसेनेला संभाव्यपणे पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याची पत्रे न दिल्यामुळे शिवसेनेची वेळ निघून गेली. शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. पण राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. 

राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला आपली भूमिका कळविण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यावर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी हे ट्विट केले आहे. 

जम्मू-काश्मीरः गांदरबलमध्ये चकमकीत एका दहशतवाद्यांचा खात्मा

संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर एँजिओग्राफी आणि एँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत होते.