पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेवाटपाला विलंब का होतंय मुख्यमंत्रीच सांगतील - संजय राऊत

संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर होण्याला उशीर का होतोय, हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबद्दल सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एबीपी माझा वाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे सुद्धा मला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे विधान परिषद पोटनिवडणुकीत उतरणार?

संजय राऊत म्हणाले, मंत्रिमंडळात कोणतेही खाते वजनदार किंवा कमी वजनाचे नसते. मिळेल त्या खात्यामध्ये काम चांगले काम करता येते. पण असे असतानाही खाते वाटपाबाबत तारीख पे तारीख का पडते आहे, हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच हे सांगू शकतील. 

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणी कपात

विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज होते, अशी माहिती मिळते आहे.