पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री; तिन्ही पक्षांची सहमती: संजय राऊत

संजय राऊत

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसैनिकच विराजमान होणार आहे. पुढील ५ वर्ष शिवसेनाचा मुख्यमंत्री असेल. याला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची सहमती असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासंदर्भात आज मुंबईमध्ये तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे. 

 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महत्वाची बैठक; आज सरकार स्थापनेचा दावा?

‘महाराष्ट्राला मजबूत आणि कणखर व्यक्तिमत्व मिळेल. येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची ऑफर आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या वृत्ताचे संजय राऊत यांनी खंडन केले आहे. ‘भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव आला नाही. इतर कुणाच्या ऑफरची वेळ संंपली आहे. आता कुणी इंद्राचे आसन जरी दिले तरी आम्हाला नको.’, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

उद्धव ठाकरेंविरोधात औरंगाबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत अशी सर्वाची इच्छा आहे. महाराष्टातील जनतेच्या मनात आणि प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. तसेच महाआघाडीच्या नेत्यांची देखील हिच इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, आज तिन्ही पक्षांची बैठक होणार असून बैठकिला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महत्वाचे निर्णय होतील. त्यानंतर राज्यपालांकडे कधी जायचे यावर निर्णय घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

'अग्रलेखांचा बादशहा' नीलकंठ खाडिलकर यांचे निधन