पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेने ठरवले तर बहुमत जमवू शकते, संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

संजय राऊत

शिवसेनेने मनात आणले तर आम्ही बहुमत जमवू शकतो आणि विधानसभेत सिद्धही करू शकतो, असे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शुक्रवारी भाजपला इशारा दिला. मुख्यमंत्रीपदासह सर्व सत्तापदांचे समसमान वाटप झाले पाहिजे, यावर शिवसेना ठाम असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

'तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा, दखल न घेतल्यास आंदोलन करू'

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता आठवडा झाला आहे. तरीही युतीतील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आम्ही कोणालाही अल्टिमेटम देत नाही. पण शिवसेनेने ठरवले तर ते बहुमत सिद्ध करू शकते आणि सत्ताही स्थापन करू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील हॉटेल ब्लू सीमध्ये पत्रकार परिषदेत काय सांगण्यात आले हे महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहे. राज्यातील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते होणारच, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. चर्चेला सुरुवात करण्याची जबाबदारी कोणाची आहे. २४ तारखेला निकाल लागल्यावर त्याच दिवशी चर्चेला सुरुवात व्हायला हवी होती, असेही त्यांनी सांगितले. 

कर्तारपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी इम्रान खान यांच्याकडून आणखी सवलती

उद्धव ठाकरे शनिवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्याच्या अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.