पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट

संजय राऊत (ANI)

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दुपारी एक सूचक ट्विट केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील, असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी मुंबईत होते आहे. या अधिवेशनामध्ये मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने पुढील वाटचाल करणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अजून हिंदूत्ववाद सोडले नसल्याचे सांगण्यासाठी संजय राऊत यांनी हे ट्विट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शुभमन गिलच्या संघाचा विजय विराट सेनेसाठी शुभ संकेत देणारा

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेसाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि मुख्यमंत्रीपदी खुद्द उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असताना शिवसेनेला आपल्या हिंदुत्वावर पाणी सोडावे लागल्याची चर्चा आहे. त्याचवेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात राज्यव्यापी अधिवेशनाची घोषणा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीलाच आपण हे अधिवेशन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज ठाकरे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही: छगन भुजबळ

मनसने आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचा झेंडा आता प्रभावीपणे भगव्या रंगाचा करण्यात आला आहे. मनसेची बहुतांश कार्यालयेही भंगव्या रंगाने रंगविण्यात आली आहे. मनसे आता हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे दिसायला लागले. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर म्हणजे मार्च महिन्यात ते अयोध्येला जातील. सरकारमध्ये सर्व व्यवस्थित सुरू आहे. सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीरामाची आमच्यावर कृपा असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sanjay raut said CM uddhav thackeray will visit ayodhya after completing 100 days of maharashtra govt