गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी एक सूचक ट्विट आणि त्यानंतर पत्रकार परिषद यामुळे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत दिवसभर चर्चेत असायचे. गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळीही संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी हाऊ इज जोश? जय महाराष्ट्र... एवढेच म्हटले आहे. अत्यंत नेमक्या शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे.
शपथविधीसाठी मुंबईतले हे रस्ते बंद, या पर्यायी मार्गाचा करा वापर
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचे महाविकास आघाडीचे सरकार सत्यात येण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून त्यांनी मित्रपक्ष भाजपला रोजच्या रोज फटकारत त्यांना शिवसेनेपासून व्यवस्थितपणे दूर करण्याचे काम केले. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली जी भाजपने शेवटपर्यंत मान्य केली नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी प्लॅन बी प्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णयासाठी आवश्यक वातावरण तयार केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ते सातत्याने संपर्कात होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
'नव्या सरकारसाठी सोनियाजींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हवे'
गुरुवारी संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीची शपथविधी सोहळा होतो आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
How is Josh?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
जय महाराष्ट्र