पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून शिवसेनेच्या आमदारांना रंगशारदामध्ये ठेवलंय

शिवसेना आमदार मातोश्रीवरून बाहेर पडताना (फोटो - सतीश बाटे)

विधानसभेत नव्याने निवडून आलेल्या आमदारांना अद्याप सरकारी निवासस्थान देण्यात आलेले नाही. अनेक आमदार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा लांबच्या भागातून मुंबईत आले आहेत. त्यांना अजून काही दिवस मुंबईत राहावे लागणार आहे. यासाठीच त्यांच्या राहण्याची व्यवस्था रंगशारदामध्ये करण्यात आली असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले.

शिवसेनेच्या ठाम भूमिकेवर भाजपचे मौन

शिवसेना आमदारांची बैठक गुरुवारी 'मातोश्री'वर बोलाविण्यात आली होती. त्यानंतर सर्व आमदारांना वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा हॉटेलमध्ये उतरविण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, शिवसेनेचा कोणताही आमदार आमच्यापासून दूर जाणार नाही. कोणीही पैसे देऊन किंवा गुंडगिरी करून आमचे आमदार खरेदी करू शकणार नाही. पण आमदार नव्याने निवडून आले आहेत. अद्याप त्यांना मुंबईत निवासस्थान देण्यात आलेले नाही. अजून काही दिवस मुंबईमध्ये राहण्यासाठी रंगशारदामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणतात, मला स्वतःहून युती तोडायची नाही पण...

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना अद्याप अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावर ठाम आहे. तर मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही तडजोड करण्यास भाजप तयार नाही.