पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवरांच्या राजीनाम्यात 'त्याग' नाही, निरुपम यांनी व्यक्त केला 'राग'

संजय निरुपम आणि मिलिंद देवरा

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याची लाट येणार का? असा प्रश्न निर्माण होत असताना काँग्रेस नेता मिलिंद देवरा आणि मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. मिलिंद देवरा यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलेल्या शिफारशीवर संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. ट्विटच्या माध्यमातून मिलिंद देवरा यांचा राजीनामा दिल्लीत यापेक्षा मोठे पद मिळवण्याच्या दृष्टिने घेतलेला निर्णय आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

 ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही दिला राजीनामा

मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या कामकाज चालविण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस केली होती. प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही, असेही निरुपम यांनी म्हटेल आहे. 

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र! मिलिंद देवरा यांचा पदत्याग

राजीनामा घेण्याच्या निर्णयात त्यागाची भावना असायला हवी. पण इथे राष्ट्रीय स्तरावर पद देण्याची धडपड दिसते, असा टोला ट्विटच्या माध्यमातून निरुपम यांनी देवरा यांना लगावला असून हा राजीनामा आहे की यापेक्षा मोठे पद मिळवण्याची धडपड असा प्रश्न उपस्थित करत पक्षाने अशा लोकांपासून सावध राहायला हवे, असा उल्लेखही निरुपम यांनी केला आहे.