पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीपूर्वीच मुंबई पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. दादर येथून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून मनसे नेत्यांनी काळ्या रंगाचं 'इडियट हिटलर' लिहिलेलं टी-शर्ट घातले. या टी-शर्टवरुन वाद पेटला आहे. 

राज ठाकरे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ते ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी अटक: कार्ती चिदंबरम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेने ठाणे बंदची हाक आणि ईडीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचे सांगितले होते. मात्र राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि ईडी कार्यालयावर न येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी मुंबई पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली. कलम १४९ अंतर्गत ही नोटीस पाठवली. जर नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल, असे देखील पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.

पी. चिदंबरम यांना आज सीबीआय कोर्टात केले जाणार हजर