पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय संघाच्या भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध

अबू आझमी

विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. एका बाजूला भारतीय संघाच्या विश्वचषकातील विजयी घोडदौडीची चर्चा सुरु असताना  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेतला आहे. 

अशी असेल विराट सेनेची भगवी जर्सी!

भारतीय संघाच्या भगव्या जर्सीच्या पार्श्वभूमीवर अबू आझमी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना संपूर्ण देशाचे भगवीकरण करायचे आहे. भारतीय संघासाठी भगव्या रंगाच्या जर्सीला पसंती का दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

ICC WC कोहलीची पावले चालती 'विराट' विक्रमाची वाट

फुटबॉल प्रमाणे क्रिकेटमध्ये आयसीसीशी संलग्नीत संघांना घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जर्सी वापरण्याच्या नियम विश्वचषकापूर्वी आयसीसीने केला. या नियमानुसार बीसीसीआयने भारतीय संघासाठी ब्लू जर्सीनंतर भगव्या रंगाच्या जर्सीचा पर्याय निवडला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:samajwadi party mla abu azmi objection over indian team ware orange colour jersey against england