पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचा मुंबईत मृत्यू, खान कुटुंबीयांवर शोककळा

सलमान खान

अभिनेता सलमान खान याच्या पुतण्याचं मुंबईत सोमवारी रात्री उशीरा निधन झालं. प्रकृती ठिक नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून सलमानचा पुतण्या अब्दुल्ला  खान मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेत होता. अब्दुल्लाच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अब्दुल्लाच्या निधनानंतर संपूर्ण खान कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा २२५ वर, बुलढाण्यात २ रुग्ण

सलमाननं  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पुतण्याचा फोटो शेअर करुन भावनिक पोस्ट लिहिली आहे. दरम्यान सलमान खानचं संपूर्ण कुटुंब हे सध्या पनवेनमध्ये आहे. चित्रीकरण रद्द झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी सलमान खान आपल्या कुटुंबीयांना घेऊन त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये निघून गेला.

 कोरोना विषाणूमुळे चित्रपटसृष्टीतील चित्रीकरण गेल्या १९ मार्चपासून बंद आहे त्यामुळे या क्षेत्रातील २५ हजार रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मदत करण्याचा निर्णय सलमाननं घेतला आहे.

'लॉकडाऊनमुळे राज्यात १० हजार टन ताजी मासळी समुद्रात फेकली'