पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणपतीच्या सुवर्णालंकार मागणीत ७०% घट

गणपती

सोन्याच्या वाढलेल्या  किंमतीचा फटका आता गणेशोत्सवासही बसला आहे. साधरण गणपतीच्या आगमनाआधी काही दिवस सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. अनेक भाविक, मंडळे बाप्पासाठी सोन्याची विविध आभुषणे तयार करतात. यात सोन्याचे तोडे, मुकुट, हार, जास्वंद, दुर्वा, सोन्याचा दंत यांचा समावेश असतो, मात्र सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे आता गणपतीच्या सुवर्णालंकार मागणीत ७०% घट झाली आहे.

गतवर्षाच्या तुलनेत सोन्याची किंमत वाढली आहे. ३७ ते ३८ हजार रुपये तोळ्यामागे मोजावे लागत आहे. वाढलेल्या किमतीमुळेच गणपतीच्या  सुवर्णालंकाराच्या मागणीत ७०% ची घट झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स संघटनेनं दिली आहे. मात्र चांदीच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ झाल्याचं ते म्हणाले. 

मंदी टाळण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा

गेल्यावर्षी सोन्याची किंमत प्रती तोळ्यामागे २९,००० इतकी होती.  मात्र आता ती ३८ हजारांच्या घरात पोहोचली आहे. म्हणूनच या वर्षी सुवर्णलंकाराच्या मागणीत खूपच घट झाली आहे. भाविक सुवर्णलंकाराची खरेदी पुढे ढकलत आहे किंवा ते कमी प्रमाणत सोनं खरेदी करत आहेत अशी माहिती मुंबई ज्वेलर्स संघटनेचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी दिली.  गेल्या वर्षीच्या तुलनेत किमती ८ ते ९ हजारांनी वाढल्या आहेत त्यामुळे मागणीवर परिणाम झाल्याचं ते म्हणाले.

'आर्थिक मंदीची चिंता दूर करण्यासाठी नव्या सुधारणांची गरज'

दरवर्षी आमच्याकडे  कमीत कमी गणपतीच्या  १५ दागिन्यांची ऑडर्स असायची  मात्र यंदा २ ते  ३ ऑडर्स  आहेत. पण चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी चांदीच्या दागिन्यांच्या १० ऑडर्स होत्या यंदा त्या १५ आहेत अशी माहिती चिंचपोकळीच्या रत्नदीप चिंदरकर यांनी दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sale of gold ornaments that devotees offer to Ganpati during the festival drop by 70 percent