पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेंबूरमधील साई हॉस्पिटल सील; बाळासह आईला कोरोनाची लागण

चेंबूर साई हॉस्पिटल सील (Photo: Aalok Soni/ HT)

राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात मुंबईतल्या चेंबूर भागामध्ये असलेल्या साई रुग्णालयात तीन दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य प्रशासनाने तातडीनं साई हॉस्पिटल सील केले. 

 

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोना; सोबतचे २३ जण क्वारंटाईन

२६ मार्च रोजी एका गरोदर महिलेला साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याठिकाणी महिलेने बाळाला जन्म दिला. महिलेमध्ये कोरोनाची काही लक्षण दिसून आल्यामुळे ३० मार्च रोजी तिची आणि बाळाची कोरोना तपासणी करण्यात आली. ३१ मार्चला आलेल्या तपासणी अहवालामध्ये महिलेला आणि तिच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 

क्वारंटाइनमध्येही लोक ऐकायला तयार नाहीत, हॉस्पिटलमध्ये नमाज पठण

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि  बेजबाबदार कारभारामुळे आईला आणि बाळाला कोरोनाची लागण झाली, असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. सध्या महिलेला आणि तिच्या बाळाला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने साई हॉस्पिटल सील केले.  

अरूणाचल प्रदेशच्या सीएमचा दावा; १५ एप्रिलला लॉकडाऊन संपेल, पण...