पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली

सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी  मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक आलेल्या निधनाच्या वृत्तानंतर बॉलिवूडसह जगभरातील अन्य क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटर विरेद्र सेहवाग या क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी इरफान पठाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

अभिनेता इरफान खानचे निधन

इरफान खान गेल्याचे वृत्त हे दुख:दायी आहे. तो माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक होता. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'अंग्रेजी मीडियम'सह त्याने काम केलेले सर्व चित्रपट पाहिले आहेत. 'अंग्रेजी मीडियम'  चित्रपटातही त्याने आपल्यातील अभिनयाची क्षमता दाखवून दिली होती, अशा शब्दांत सचिनने इरफान खान यांच्या संदर्भातील आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो! त्याच्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. 

चारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन

सचिनसह माजी क्रिटर विरेंद्र सेहवाग याने देखील ट्विटरच्या माध्यमातून इमरान खानला श्रद्धांजली वाहिली आहे. एक सर्वोत्तम  आणि अभिनेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दात सेहवागने हे वृत्त ह्रदयाला चटका लावून जाणारे आहे, असे म्हटले आहे. माजी क्रिकेटर्सशिवाय राजकीय क्षेत्रातूनही इरफान खान यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sad to hear the news of IrrfanKhan passing away He was one of my favorites and love watched almost all his films Sachin Tendulkar