पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महायुतीचं त्रांगडं: 'कमळा'वर लढण्यास खोतांचा होकार, जानकरांचा नकार

सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर

लोकसभा निवडणुका झाल्या, त्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. आता विरोधकांसह महायुतीलाही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या जागावाटपाबाबत भाजप-शिवसेनेची चर्चा सुरु असली तरी महायुतीमध्ये सामील असलेल्या छोट्या पक्षानींही बाह्या सरसावल्या आहेत. भाजपने छोट्या पक्षांना 'कमळ' या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. पण याला महायुतीतील किती पक्ष साथ देतील हे येणाऱ्या काळात समजेल. कारण, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आगामी विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे रासपचे महादेव जानकर यांनी कमळ चिन्हावर न लढता स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीत सध्या तरी प्रत्यक्ष जागांपेक्षा 'कमळा'वरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 

जानकरांना ५० कोटींची खंडणी मागितली, ५ जणांना अटक

'महायुतीतील छोट्या घटकपक्षांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर त्यांना विजयाची चांगली संधी मिळू शकते. या पक्षांच्या नेत्यांच्या आम्ही संपर्कात असून याबाबत त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे,' राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना जानकर यांनी रासपची भूमिका मांडली. ते म्हणाले, 'मी महायुतीतील इतर कोणत्याही सहकारी पक्षांशी यावर चर्चा केलेली नाही. पण आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही.' २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही रासपने स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. 

गतवर्षी विधान परिषद निवडणुकीवेळीही जानकर यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. विधान परिषदेतील पहिल्या टर्ममध्ये  ते भाजपचे सदस्य होते. 

तर सदाभाऊ खोत यांनी संघटना हा स्वतंत्र पक्ष नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे म्हटले होते. संघटनेची सहा जूनला पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये आगामी निवडणुकीविषयी चर्चा करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले होते.

हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

महायुतीतील लहान घटक पक्ष यात रासप, विनायक मेटे यांचा शिव संग्राम, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांच्या रिपाइंचा समावेश आहे. जर या पक्षांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास होकार दिला. तर शिवसेनेसाठी ही चांगली बातमी नसेल.

दरम्यान, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी युतीमध्ये जागावाटपावरुन तणाव नसल्याचे माध्यमांना म्हटले आहे. भाजपने जागावाटपाचा सादर केलेला फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या घटक पक्षांना १८ जागा तर भाजप-शिवसेना यांनी १३५ समसमान जागांवर लढण्याचे निश्चित केल्याचे म्हटले होते. 

वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीलाच फायदा: रामदास आठवले

धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांचा पूर्वीपासून स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह राहिलेला आहे. यापूर्वीही त्यांनी २०१४ मध्ये बारामती लोकसभा निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर लढवली होती. त्यावेळीही त्यांनी रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीच्या सु्प्रिया सुळे यांच्याकडू त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागू शकला असता असे बोलले गेले होते.