पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चर्नीरोड येथे इमारतीला आग; एकाचा मृत्यू ५ जण जखमी

मुंबईत इमारतीला आग

मुंबईतील चर्नीरोड येथे इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ड्रीमलँड सिनेमागृहाजवळील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह ५ जण जखमी झाले आहेत. 

चर्नीरोड येथील शांतीनिकेतन या रहिवासी इमारतीला सकाळी ६ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली. इमारतीमध्ये अडकलेल्या सर्वांना अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेन आणि सिडीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. 

'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'

या दुर्घटनेमध्ये आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. धुरामुळे आणि शरिरात पाणी कमी झाल्यामुळे सुदान गोरे हे कर्मचारी बेशुध्द पडले. तर बचाव कार्यादरम्यान नंदकुमार वायाळ हे जखमी झाले. अग्निशमन दलाच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीमध्ये राहणारे ३ जण जखमी झाले आहेत. धुरामुळे गुदमरुन तीन जण इमारतीच्या तीसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर बेशुध्द पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढून जे. जे रुग्णालयात दाखल केले. दिलीप चौधरी (४० वर्ष), अशोक चौधरी (२३ वर्ष) आणि भरत चौधरी (२३ वर्ष) हे तिघे जखमी झाले आहेत. 

राज ठाकरेंनी मामलेदार मिसळचा घेतला आस्वाद