पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईः नाल्यालगतच्या झोपड्या हटवणार- मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुसळधार पावसामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ढिम्म झाली आहे. अनेक ठिकाणी भिंत कोसळल्यामुळे जिवितहानीही मोठ्याप्रमाणात झाली आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक धोरण स्वीकारले आहे. पावसानंतर तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तातडीने नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, नाल्यांजवळील चार मजली झोपडपट्ट्या हटवण्याचे निर्देश त्यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. झोपड्या काढण्याला विरोध करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी निक्षून सांगितले. 

शिवसेनेनं मुंबई तुंबून दाखवली, धनंजय मुंडेंचा टोला

मुंबईतील परिस्थितीवरून विधिमंडळाच्या अधिवेशनात गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना झोपड्या हटवणार असल्याचे जाहीर केले. मुंबईतील नाल्यांवर तसेच नद्यांच्या परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर झाली असून, पाणी साचण्याच्या दृष्टीने मुंबईतील हीच मोठी समस्या असल्याचे ते म्हणाले. नाल्यांजवळील चार मजली झोपडपट्ट्या हटवताना विरोध करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगताना त्यांनी या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात येणार असून, स्थलांतराला विरोध करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. 

आता राजकारण नव्हे मदत करण्याची गरजः आदित्य ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:remove drain side slums for water logging in mumbai says cm devendra fadnavis in state assembly