पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेडी रेकनरच्या दरात कपात करा, आदित्य ठाकरेंची शिफारस

आदित्य ठाकरे मूल्यदर तक्ते बघताना (फोटो - ट्विटर हँडलवरून साभार)

सर्वसामान्यांना कमी किंमतीत सदनिका विकत घेता याव्यात आणि गृहनिर्माण उद्योगाला चालना मिळावी, यासाठी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीच्या रेडी रेकनर दरात कपात करण्याची शिफारस केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली. 

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद यशस्वी'

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक कार्यालयात वार्षिक मूल्यदर तक्ते २०२०-२१ संदर्भात आज बैठक झाली. यावेळी आपण गृहनिर्माण उद्योगाला चालना देण्यासाठी आणि सध्याच्या अर्थव्यवस्थेत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात कपात करण्याची शिफारस केली आहे. 

NRC, NPR नंतर आता NBRवर सरकारचा विचार सुरु

रेडी रेकनरचे नवे दर दरवर्षी एक एप्रिलपासून लागू करण्यात येतात. या दराच्या आधारावर संबंधित भौगोलिक क्षेत्रामध्ये घरे विकत घेणाऱ्या व्यक्तीला मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरावे लागते. जर रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली तर त्यामुळे मुद्रांक शुल्कही वाढते. रेडी रेकनरच्या दरात कपात झाल्यास मुद्रांक शुल्कही कमी होते. यामुळे अनेक ग्राहक सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर रेडी रेकनरचे दर महत्त्वाचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून गृहबांधणी क्षेत्रामध्ये मंदीची स्थिती आहे. त्यामुळे रेडी रेकनरचे दर हा या क्षेत्राला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.