कर्नाटकमध्ये सत्तारुढ जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरुच आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याला आता एक नवे वळण मिळाले आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावापूर्वी यू-टर्न करणारे काँग्रेसचे आमदार एमटीबी नागराज पुन्हा मुंबईला गेले. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांनी स्वतःला धोका असल्याचे सांगत मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. कोणत्याही काँग्रेस नेत्याची आम्हाला भेट घ्यायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी घेतले साईबाबांचे दर्शन
काँग्रेस आमदार नागराज हे पुन्हा मुंबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार गंभीर संकटात आले आहे. याचदरम्यान कर्नाटकमधील बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून पुरेशी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. मागील आठवड्यात विधानसभेचा राजीनामा देणाऱ्या या आमदारांनी काँग्रेसचे नेते आम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना म्हटले होते.
Mumbai: 14 rebel K'taka MLAs write to Sr Police Inspector, Powai Police Station. Write '...we've absolutely no intentions in meeting Mallikarjun Kharge, GN Azad or any Congress dignitaries from Maharashtra&K'taka or any political leader as we anticipate serious threat from them.' pic.twitter.com/RfI2Jt6d6D
— ANI (@ANI) July 14, 2019
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर सोमवारी सकाळी मुंबईत येऊन या बंडखोर आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पोलिसांना लिहिलेल्या आपल्या पत्रात बंडखोर आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांचेही नाव घेतले आहे.
काँग्रेसच्या ५ बंडखोर आमदारांची राजीनाम्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गुलामनबी आझाद किंवा महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील कोणत्याही काँग्रेस नेत्याशी भेटण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला त्यांच्याकडून गंभीर धोका आहे.
यापूर्वी पक्षाचे संकटमोचक डी के शिवकुमार हेही मुंबईला आले होते. पण आमदारांनी त्यांची भेट घेण्याचे टाळले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर आमदार एमटीबी नागराज यांची मनधरणा करण्यात अपयश आले. नागराज हे रविवारी मुंबईत परत आले.