पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार या फक्त अफवा: आरबीआय

आरबीआय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पहायला मिळत आहे. बँकेतील पैसे काढण्यासाठी तसंच खात्यातील रकमेची माहिती जाणून घेण्यासाठी खातेदारांनी बँकेमध्ये गर्दी केली आहे. असे असताना अचानक सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असून तुमचे पैसे आताच काढून घ्या असे मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या अफवा असल्याचे स्पष्टीकरण देत आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नसल्याचे सांगितले आहे.

येत्या शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार - शरद पवार

अर्थसचिव राजीव कुमार यांनी ट्विट करत असे सांगितले की, 'सोशल मीडियावर पसरत असलेले मॅसेज चुकीचे आहेत. ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सार्वजनिक बँकांना बळकटी देण्याचे काम आरबीआय करत आहे. त्यामुळे बँका बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे बँका बंद होणारे मॅसेज चुकीचे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिली आहे. 

पाकिस्तानशी नव्हे, टेररिस्तानशी चर्चेला अडचण - जयशंकर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सार्वजनिक क्षेत्रातील ९ बँका कायमस्वरुपी बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे आताच काढून घ्या असे मॅसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचा या मॅसेजमध्ये समावेश आहे. या सर्व अफवा आहेत. कोणत्याही बँका बंद होणार नाहीत, असे आरबीआयने आज स्पष्ट केले आहे. 

ईडीच्या कारवाईशी राज्य सरकारचा संबंध नाहीः मुख्यमंत्री