पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँक खातेधारकांना दिलासा, RBI ने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली

पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्यानंतर बँकेतील ठेवी काढण्यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना आता २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढणे शक्य होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेते काही दिवासंपूर्वीच पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर काही निर्बंध लादले होते. 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण; बँकेच्या दोन संचालकांना अटक

कोणत्याही ग्राहकाला कर्ज पूरवठा करु नये, असे आदेश आरबीआयने दिले होते. याशिवाय खातेधारकांना केवळ आपल्या खात्यातून १० हजार इतकी रक्कम काढता येईल, असेही आदेश आरबीआयकडून देण्यात आले होते. यामुळे बँकेतील खातेधारकांची चिंता वाढली होती.  आरबीआयने खात्यावरील रक्कम काढण्याची मर्यादा वाढवल्याने अनेक खातेधारकांना दिलासा मिळणार आहे.

एकनाथ खडसे माझ्या संपर्कात - शरद पवार

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. या घोटाळा प्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन सजबीरसिंग मठ्ठा यांनी या घोटाळा प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.