पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बहुमत सिध्द करण्यास अडचण येणार नाही: दानवे

रावसाहेब दानवे

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भाजपमध्ये हालचालिंना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. विधानसभेत आम्हीच बहुमत सिध्द करुन दाखवू. बहुमत सिध्द करण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

राजीनामा देऊन परत या; राष्ट्रवादीकडून अजित पवारांची मनधरणी

तसंच, भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी रात्री ९ वाजता गरवारे क्लब येथे बैठक होणार आहे. आमदारांच्या बैठकीनंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. भाजपच्या आमदारांच्या बैठकीमध्ये नेमकी काय दिशा ठरवली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'एक भगतसिंह देशासाठी फाशीवर गेले तर एकानं लोकशाहीची हत्या केली'

दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थीतीवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर २७ नोव्हेंबर रोजीच मतदान घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करा. त्यानंतर पाच वाजण्याच्या आत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. 

गेल्या तीन दिवसांतील कोर्टाच्या लढाईतील १० महत्त्वाच्या घडामोडी