पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'संजय राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल'

रावसाहेब दानवे

भाजप अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र, संजय राऊत यांना सत्तेत येण्यापूर्वीच वेड लागले, असल्याची टीका भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. राज्यपालांवर संजय राऊत यांनी जास्त बोलू नये. सत्तेची वाट पाहताना संजय राऊतांना वेड लागले आहे. त्यामुळे राऊतांना काही दिवसांनी वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, अशी घणाघाती टीका दानवे यांनी केली आहे. 

राज्यपालांनी घटनात्मक बाबी पूर्ण केल्या नाहीत हा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याला रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. 'राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली नाही. त्यांनी घटनात्मक चौकटीत राहूनच निर्णय घेतला आहे. आमदारांच्या सह्यांचं पत्र आणि गटनेत्यांची उपस्थिती असल्याने भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिली.', असल्याचे दानवे यांनी सांगितले. 

पदभार स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी केले हे काम

दरम्यान, 'अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. भाजपचे आमदार त्यांना मदत करण्यासाठी बांधावर आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून मजा करत आहेत.', अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच, 'अजितदादा अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहे. तेच व्हीप काढतील. तो त्यांच्या आमदारांना लागू पडणार आहे.', असे देखील त्यांनी सांगितले आहे. 

क्रिकेटला भ्रष्टाचारमुक्त करा, रायडूचा अझरुद्दीनवर पलटवार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:raosaheb danve says after a few days sanjay raut will have to be sent to a mental hospital