पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रकुल प्रीतनं लॉकडाऊन संपेपर्यंत झोपडपट्टीतील २०० कुटुंबीयांच्या जेवणाची केली व्यवस्था

रकुल प्रित

कलाकार समाजभान जपत कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशवासीयांची मदत करत आहेत. कोणी आर्थिक निधी देऊ केला आहे तर कोणी जेवणाची व्यवस्था. अभिनेत्री रकुल प्रीत हिनंही  समाजभान जपत २०० कुटुंबीयांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे.

अभिनेत्रींच्या घरात शिजतंय काय?

रकुल ग्रुरुग्राममध्ये राहते. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब कुटुंबांना दोन वेळचं जेवण देण्याचं रकुल आणि तिच्या कुटुंबीयांनी ठरवलं आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत आम्ही गरजूंना जेवण देणार आहे, लॉकडाऊनचा कालावधी वाढवला तरी आम्ही मदत करणार आहोत असंही ती टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

कोविड-१९ : कनिकाचा रिपोर्ट अखेर निगेटिव्ह, पण...

ती राहत असलेल्या निवासी इमारतीत दररोज गरीबांसाठी जेवण तयार करण्यात येतं. अन्न गरीबांना वाटण्यासाठी रकुलचा एक चाहता स्वत:हून पुढे आला आहे. तो अन्न गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रकुलच्या कुटुंबीयांना  मदत करत आहे. माझ्या कुटुंबीयांशिवाय ही मदत करणं अशक्य होतं असंही रकुल म्हणाली.