पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'त्या' काळी फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते : राज ठाकरे

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. इतिहासातील छत्रपती शिवाजी महारांजाच्या मंत्रिमंडळाचा दाखला देताना त्यांनी देशमुख, सरदेशमुख या महाराजांच्या मंत्रिमंडळातील काही पदांचा उल्लेख केला. यावेळी मुलाखतकारांनी त्यांना फडणवीस हे पदही होते, असे सांगितले. यावर प्रतिउत्तर देताना महाराजांच्या नंतरच्या काळात फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. 

दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, शरद पवारांचा केंद्र सरकारवर

ठाण्यातील मटा वृत्तसमूहाकडून आयोजित करण्यात आलेल्या  कलासंगम कार्यक्रमातील मुलाखतीवेळी राज ठाकरे यांनी कला आणि राजकीय घडामोडींसह राज्यातील राजकारणावरही भाष्य केले. सध्याच्या घडीचे राजकारण हे समजण्यापलिकडचे आहे. सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष विरोधात बसला असून ज्यांना जनमत मिळाले नाही, ते सत्तेसाठी एकत्रित आले आहेत. कोणीही कोणासोबत जात असल्यामुळे राजकारणाचा विचका झाला आहे, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाव न घेता टीका केली.   

मोदी-शहांसह उद्धव ठाकेरेंचंही चांगल व्यंगचित्र काढता येईल: राज ठाकरे

निकाल लागला त्यादिवशी एकच दिवस आनंद झाला, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. कोणीही कोणासोब जात असल्यामुळे राजकीय ताळतंत्र बिघडले आहे. हे फक्त पक्षापूरते मर्यादित नसून याचा परिणाम सर्वसामान्य जनतेलाही भागावा लागतो. यावेळी राज्यातील जनतेचे त्यांनी कौतुकही केले. पक्षांतर करणाऱ्या अनेकांना राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने धडा शिकवला, असा उल्लेख त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला. राज्याची घडी बिघडण्यामध्ये परदेशातून येणारेच कारणीभूत असल्याचा पुनरउच्चार त्यांनी केला.