पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सगळं आधीच ठरलं असेल तर निवडणूक लढवायचीच कशाला - राज ठाकरे

राज ठाकरे

निवडणुकीत हार-जीत होतच असते. पण जर कोणी फसवत असेल तर काय करायचे. निवडणूक लढवायचीच कशाला, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. आटोक्यात येत नाही त्यांना संपवा, चोपड्या तयार आहेत त्यांना सोबत घ्या, हेच भाजपचे सूत्र असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

मध्य, पश्चिम रेल्वे लाईफ जॅकेट्स, बोटी खरेदी करणार; कशासाठी माहितीये?

ते म्हणाले, ईव्हीएमविरोधी आंदोलन माझे एकट्याचे नाही. निवडणुकीत हार-जीत होतच असते. पण जर कोणी फसवत असेल तर काय करायचे. जर सगळं आधीच ठरलेले असेल, तर निवडणूक लढविण्याचा द्राविडी प्राणायाम करायचाच कशासाठी. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदारसंघात घोळ झाले आहेत आणि आपण ३७० कलम घेऊन बसलो आहोत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते मतमोजणीत मोजली गेली आहेत. हा आकडा ५४ लाखांपेक्षा जास्त आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी बेकारी सध्या देशात आहे. आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी भाजपचे लोक रोज नवीन काहीतरी कायदे घेऊन येत आहेत, असे सांगून ते म्हणाले, सगळ्या राज्यांचे, तेथील भाषांचे, अस्मितांचे महत्त्व कमी करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच समान नागरी कायदा आणला जाईल, राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जाईल. सामान्य लोक देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून त्यातच रमतील. 

माहिती अधिकार कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांवरही राज ठाकरे यांनी टीका केली. कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही, हे आता सरकार ठरविणार आहे. माहिती अधिकाऱ्याच्या सर्व नाड्या सरकारच्या हातात आहेत. म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. ज्या माहिती अधिकारामुळे अनेक घोटाळे बाहेर आले. त्यामध्ये केवळ वैयक्तिक कारणांसाठी बदल करण्यात आले आहेत. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यातील बदलांवरही राज ठाकरे यांनी टीका केली. केवळ बहुमतामुळे असे कायदे करण्याची हिंमत सरकारकडे येते. 
एवढे लोक शंका घेताहेत तर मग ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या साह्याने मतदान का घेतले जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:raj thackeray speech in mumbai about evm manipulation bjp agenda and assembly election 2019