लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा समाजाला आरक्षण देणे हा केंद्राचा विषय आहे. ते राज्य सरकार कसे जाहीर करते असा सवाल करत सरकराला फसवायचंच होतं तर तुम्ही खेळत का बसलात असा जाब विचारला. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहत असलेल्या मुलांची ही फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला.
व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात जुलमी राजवट उलथवण्याची ताकद- राज ठाकरे
राज्यातील मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही. आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात आहे राज्य सरकारने फसवणूक केली आहे. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपचे नेते कुठे आहेत असा प्रश्न राज यांनी विचारला. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका, राज ठाकरेंची जनतेला विनंती
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या देशभक्त विरुद्ध गालीभक्त या वक्तव्याचा समाचार घेतला. मोदी म्हणजे देश नाही. देशभक्तीचे प्रमाणपत्र त्यांनी वाटायचे नाही. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना जेव्हा केक भरवला तेव्हाच ठरवायचे होते, असा टोलाही लगावला. तसेच दहशतवादी हा दहशतवादी असतो. तो मुसलमान, हिंदू वगैरे काही नसतो. मोदींनी मागील निवडणुकीच्या वेळी शब्द दिले होते. त्यावर ते काही बोलताना दिसत नाहीत. ज्याचा संबंध नाही त्यावर ते बोलत आहेत. प्रचाराच्या भाषणात पुलवामा येथे शहीद झालेल्यांचा काय संबंध, राजीव गांधी यांचा काय संबंध, अशामुळे देशाचे हसे होते, असे ते म्हणाले.
राज ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा 'सेम टू सेम'
राज्य सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. पूर्वीच्या सरकारवर सिंचनामध्ये भ्रष्टाचार झाल्याच आरोप करत भाजपने सत्ता मिळवली. नंतर सिंचनाची हजारो कोटींची कामे केल्याचा दावा केला. सिंचनाची जर कामे झाले असतील तर मग २९ हजार गावांमध्ये दुष्काळ का जाहीर करावा लागला. यावर केलेला पैसा कुठे गेला, असा थेट सवाल त्यांनी केला. ही सर्व प्रश्ने मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना विचारली. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच उत्तर दिली नाहीत, असे त्यांनी सांगितले.