पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

राज ठाकरे

'मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी रोजी मनसे मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चासंदर्भात वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दोन सूचना दिल्या. राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्यामुळे फक्त १० मिनिटांमध्येच ते या बैठकीतून निघून गेले. 

'जय मोदीचा नारा दिला तर पाकिस्तानींना सुद्धा पद्मश्री मिळेल'

हिंदुहृदयसम्राट हा मान फक्त बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यामुळे मला यापुढे हिंदुहृदयसम्राट म्हणू नये, असे राज ठाकरे यांनी बैठकी दरम्यान सांगितले. तसंच, ९ फेब्रुवारीला सीएए समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चादरम्यान राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अवमान होता कामा नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. या झेंड्याचा आदर केला पाहिजे, अनादर होता कामा नये. न भूतो न भविष्यती मोर्चा काढा, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

पद्मश्रीवरून टीका करणाऱ्यांना अदनान सामीने दिले असे उत्तर

दरम्यान, बैठक संपल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मोर्चाची माहिती देऊ. पोलिसांची परवानगी मिळाली की मोर्चा कुठून निघणार हे स्पष्ट होईल. मात्र आझाद मैदानावरच मोर्चा संपणार हे नक्की, असे त्यांनी सांगितले. तसंच, राज ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राटचे होर्डिंग किंवा बॅनर्स लावू नये असे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

तर मराठवाडा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, फडणवीसांचा इशारा