लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावलेल्या पत्रकार परिषदेची चांगलीच चर्चा सुरु आहे. जर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाच बोलायचे होते तर पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत कशाला आले? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी वृत्तवाहिनी एबीपीशी संवाद साधताना उपस्थित केला. आपल्या कारकिर्दीत एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी पत्रकारांच्या प्रश्नाला घाबरत आहेत, असा आरोप करत पत्रकारांचे प्रश्न टाळणाऱ्या मोदींनी हिंमत असेल तर यासंदर्भात जनतेला स्पष्टिकरण द्यावे, असे आव्हानही त्यांनी मोदींना दिले आहे. मोदींचा हा मानसिक पराभव आहे, असेही राज यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’ !#PMPressMeet #PMPressConfere
— Raj Thackeray (@RajThackeray) May 17, 2019
तत्पूर्वी आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मोदींनी उपस्थिती लावलेल्या पत्रकार परिषदेवर टिप्पणी केली होती. "पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’" अशा शब्दात त्यांनी मोदींवर खोचक टीका केली होती. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषेदत मोदींची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. आतापर्यंतच्या आपल्या कार्यकाळात मोदींनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत उपस्थिती दर्शवली होती.
शेतकरी आंदोलनातून मनसेचा ग्रामीण भागात पोहोचण्याचा प्रयत्न
भाजपच्या या पत्रकार परिषदेत मोंदीना ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावेळी त्यांनी अमित शहांकडे बोट दाखवले. पक्षाचे अध्यक्ष तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी भूमिका घेत मोदींनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. या भूमिकेनंतर विरोधकांना त्यांच्यावर निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली आहे.
देशात ३०० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, पुन्हा NDA ची सत्ता येईल - अमित शहा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार रिंगणात नसताना राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ..असे म्हणत राज्यभर भाजपविरोधी प्रचारसभा घेतल्या होत्या. आपल्या प्रचारसभेत व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका करत भाजपला मतदान करु नका, असे आवाहन जनतेला केले होते.