पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रवीण सारखं टोकाचं पाऊल उचलू नका, राज यांची कळकळीची विनंती

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसीनंतर अस्वस्थ झालेल्या मनसे कार्यकर्त्यांने आत्मदहन करुन आपले जीवन संपवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. आपला सहकारी प्रवीण चौगुले याच्या निधनाची बातमी मन व्यथित करणारी आहे. आपल्या या सहकाऱ्यासारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये, अशी माझी कळकळीची विनंती आहे, असा उल्लेख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलाय. 

ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मनसेच्या अधिकृत ट्विटरवरुन एका परिपत्रकाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी प्रवीण चौगुले या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहिली. या परिपत्रकात लिहिलंय की, प्रवीणचं जसं माझ्यावर आणि पक्षावर प्रेम होत तसंच तुम्हा सर्वांचे माझ्यावर आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे. यापूर्वी देखील आपण अनेक कठीण प्रसंगातून बाहेर पडलो आहोत. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासच्या जोराव या प्रसंगावरही मात करु. ईडी संस्थाना काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यांना मी योग्य उत्तर देईन. तुम्ही शांतता राखा. ईडीच्या कार्यालयाबाहेर कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये, असे आवाहनही त्यांनी या परिपत्रकाद्वारे केले आहे.

ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच ठाण्यातील मनसेच्या प्रवीण चौगुले या कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.