पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे बुधवारी घेणार ममता बॅनर्जींची भेट

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे. त्यासाठी ते आज सकाळी कोलकात्याला रवाना झाले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्या मोदी सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते. 

भाजपमध्ये उद्या चार आमदारांचा प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

राज ठाकरे बुधवारी सकाळी पश्चिम बंगालच्या नबाना येथील राज्य सचिवालयामध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये निवडणूक, मतपत्रिकेद्वारे निवडणूक करण्याची मागणी आणि देशातील राजकीय परिस्थिती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनीच ममता बॅनर्जी यांना फोन करुन या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

शिवेंद्रसिंह राजेंचं भाजपत जाण्याचं ठरलं, आमदारकीचा दिला 

येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभरातील राजकीय पक्ष आणि विविध संघटना ईव्हीएम मशिनच्याविरोधात देशभरात आंदोलन करणार आहेत. भारत छोडो दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मनसे देखील सहभागी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे ममता बॅनर्जींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करुन २०१९ ची निवडणूक भाजपने जिंकली असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी याआधी केला होता. 

Triple Talaq Bill LIVE : रविशंकर प्रसाद यांनी विधेयक मांडले